२१ जून २०१२
मंत्रालायला आग लागली .
कित्येक कागदपत्र नष्ट झाली.
आगीत ३ दुर्दैवी लोकांचा जीव गेला.
सगळीकडे असा सूर आहे कि हि मुद्दाम लावली गेली. जेणेकरून कागदपत्र नष्ट होतील आणि भ्रष्ट राजकारण्यांना अभय मिळेल .
आग लागली का लावली गेली ते यथावकाश समोर येईलच परंतु या सर्व प्रकारातून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली ती म्हणजे "जनतेचा कौल " .
आपले यच्चयावत राजकारणी कायम जनतेच्या कौलाची भाषा वापरतात .जनतेला समजून चुकलंय कि आपल्याला मूर्ख बनवण्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही यांनी..लोकांचं स्पष्ट मत आहे कि घोटाळे खोरांना पाधीशी घालण्यासाठी हि आग लावली गेली
राज्यसरकारने CBI च्या अधिकाराची कक्षा विचारण्याचा मुद्दा आणि हि आग याचा परस्पर संबंध सामान्य जनतेच्या नजरेतून नक्कीच सुटणार नाही
घोटाळे काही एखाद दुसरा करू शकत नाही. त्यामागे पूर्ण system असते. आपल्याला जे दिसत ते असतं फक्त हिमनगाच एक टोक.या असल्या अग्निकांडातून काय निष्पन्न होईल ते माहित नाही .
पण सामन्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या कि एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे सर्व राजकारण्यांनी जनतेचा आदर आणि विश्वास कधीच गमावलाय.
जनतेच्या मनात प्रचंड संताप आणि कमालीची हतबलता आहे .
ज्या दिवशी ती बंध तोडून बाहेर पडेल तेव्हा खरी मजा येईल.
कारण आज जी मंत्रालयात आग लागली त्याची झळ मंत्र्यांना पोचलीच नाही. अग्निशमन दल आज ना उद्या त्यावर काबू मिळवेल पण जनतेच्या उद्रेकातून बाहेर पडणारी आग कोणाच्याच काबूत राहणार नाही आणि ती थेट मंत्र्यांपर्यंत पोहचेल.
तोपर्यंत उशीर झालेला नसला म्हणजे मिळवलं.


.jpg)