अण्णा आणि केजरीवाल एकाच ध्येयाने प्रेरित आहेत पण दोघांचे मार्ग वेगवेगळे! अण्णांचा नुसताच उपोषणाचा गांधीमार्ग तर केजारीवालांचा प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न !!अशा स्थितीत दोघांपैकी जास्त चांगला दिसणारा मार्ग म्हणजे केजारीवालांचा . कारण त्यात सांगी-वांगीच्या गप्पानऐवजी प्रत्यक्ष सुधारणेच्या आशेचा किरण दिसतो . अण्णाची गाडी केवळ उपोषणापर्यंतच !
जनमताचा अल्पावधीत इतका पाठींबा मिळणार नाही आणि आपल्याशिवाय यांना दुसरी गती नाही या भ्रमात राहून अण्णांनी गाडी चुकवली .. त्यामुळे आता केजारीवालांना मिळालेला लोकमत पाहून चरफडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नाही. आणि म्हणूनच हा जो EGO दिसतोय अण्णांचा, त्यात जानालोक्पालाच्या भाविश्याऐवजी आपल्या TRP ची झालेली गोची, हिच खरी ग्यानबाची मेख आहे. अशा वेळी AAP ची भलामण करणं पण आत्मसन्मानाच्या विरुध्द!! असो ...
वास्तविक भ्रष्टाचार विरोधी रथ जर केजरीवाल संसदीय मार्गाने ओढू पाहत असतील तर अण्णांनी त्यांना पाठींबाच द्यायला हवा..
आता जे काही उपोषण चाललाय त्यातून चांगलं अस काही मिळणार नाही . झालंच तर 'परिवर्तनाची' हवा तयार होईल आणि जी निर्माण करण्यात प्रसारमाध्यमांचा सर्वात जास्त हातभार लागेल . हे सांगायलाच नको कि यामुळे मुख्य मुद्द्यावरून जनतेच लक्ष दुसरीकडे जाईल.हे असे PSUDO - ISSUES करून विशेष काही फरक पडायला नको आणि तसं होणारही नाही ..
अण्णांची जनलोकपालची कल्पना कागदावर कितीही छान , सुंदर आणि परिवर्तानात्मक दिसत असली तरी तिची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती तटस्थपणे होईल याविषयी शंकाच आहे .
दुसरीकडे याचा वापर कोन्ग्रेस स्वतासाठी नक्की करून घेईल.. अण्णा इथे उपोषण करून , स्वताच्या जीवाची हेळसांड करून जनलोकपाल करिता लढा देतील आणि हा मुद्दा असाच वाढवत नेउन कोन्ग्रेस नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल करेल . एवढ्या लढ्यातून अण्णांना यश मिळेल याची शाश्वती नाही पण याचा वापर कॉंग्रेस स्वताच्या राजकीय फायद्याकरिता जरूर करेल. स्वतःच अपयश झाकून जनतेसमोर जनलोकपल हाच काय तो निर्वाणीचा मुद्दा अस चित्र उभं करून नेहमीप्रमाणे जनतेला मूर्ख बनवण्यात येईल असेच दिसते. कॉंग्रेस कडे दुसरा कुठला उपाय आत्ता तरी दिसत नाही
या चार राज्यातील निवडणूक निकालांचे अर्थ जरी वेगवेगळे असतील तरी एक गोष्ट त्यातून स्पष्ट होते ती म्हणजे " जनतेने नाकारलेलं राहुल गांधीच नेतृत्व!". किंबहुना याहून वेगळं काही होईल अशी अपेक्षा कॉंग्रेस ने करणंच चुकीच!!. चिदम्बरम, प्रणव मुखर्जी आणि तत्सम अन्य जाणत्या नेत्यांची फौज असतानाही जर कारभार सुपुत्राच्या हाती दिला तर हीच गत होणार .. असो !!! "जैसे ज्याचे कर्म तैसे ........" :) :D :Pआता मात्र दिल्लीच्या तख्तावर कोण बसेल याची उत्कंठा शिगेला पोचत चालली आहे . AAP च यश हे लोकांच्या उद्वेगाच प्रतिक आहे . जनतेला सुराज्य हवाय आणि कुठल्या भीक-योजना नकोत हे आता राजकीय पक्षांच्या लक्षात आलंच असेल. परंतु AAP नेही गोष्ट विसरू नये कि जनतेने त्यांना निवडून दिलाय कारण त्यांना ते बदल हवेत जे AAP ने देण्याची हमी दाखवली होती .त्यामुळेच "खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी" हे धोरण इथे चालणार नाही .. ते मोठ्या मंचांवर गांधी style उपोषणं करणं इथेच ठीक!!! कुठेतरी काहीतरी तडजोड करावीच लागेल आणि केलीच पाहिजे ..करणं हा संख्याबळाचा खेळ आहे. बुद्धिबळाचा नाही ओ..
या नाटकाचा पहिला अंक तर समाप्त .. आता पाहूया दुसर्या अंकात काय होता ते!


