Wednesday, May 15, 2013

Posted by Unknown On 11:35


एकीकडे गरिबी,कुपोषण,बेरोजगारी इत्यादी जगभरात आढळणाऱ्या सर्व समस्या भारतात आगदी मुबलक प्रमाणत असताना आता समाजाशी नाळ तुल्तेल्या आणि आपण समाजाचे काही देणे लागतो हे विसरून केवळ अतिरेक आणि हव्यासाच्या मागे लागलेल्या भारतातील राजकारण्यांनी काहीही दूरदर्श पण तर सोडाच पण साधे व्यहरिक वागणे देखील सोडून दिले आहे. मुंबई जवळच्या समुद्रात असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा असो आणि  आताच तामिल्नादुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी घोषणा केलेला पुतळा तमिळ मातेचा पुतळा हे त्याचीच काही उदाहरणे . अमेरिका या देशासारखा प्रगत ,सर्वांनाच हेवा वाटेल असं आपलं राज्य झालं पाहिजे अशी इछा भारतातील प्रयातेक राज्यकर्त्याची असणा आगदी स्वाभाविक आहे.नव्ह्ये भारतमातेवर प्रेम आसर्या प्रत्येक भारतीयाची तशीच इछा असेल . पण याचा निदान भारतातील राजकर्त्यांनी काहीसा चुकीचा अर्थ लावलेला दिसतो. सर्वांनाच अमेरिका म्हटल्यावर स्व्तान्त्रादेव्तेचा पुतळा आठवतो आणि त्या देशाबद्दल आदर वाटतो तो काही तो पुतळा मोठा असल्यामुळे नव्ह्ये तर त्या देशाच्या इतिहासामुळे त्या देशांनी केलेल्या विस्मयकारक प्रगतीमुळे ,त्या देशांनी जपलेल्या स्वतंत्र , लोकशाही, लोकांचे आणि कायद्याचे राज्य अश्या उत्तुंग गुणांमुळे. असो. या सर्व गोष्टींचे काहीही देणं घेणं नसलेल्या आणि केवळ जाती, भाषा ,धर्म आणि vote बँकेचे राजकारण करणाऱ्या आणि त्याद्वारेच सत्ता मिळवण्याच्या किवा सत्तेत कायम टिकून राहण्याचा विचार्कारणाऱ्या हे काय समजणार.