Sunday, June 17, 2012

Posted by Unknown On 10:14

आपल्याला रोज काहीतरी मसालेदार गप्पा लागतात. आता काय तर राष्ट्रपती कोण होईल यावर घोळ सुरु .
आपण पण सगळीकडे तेच पाहतोय.
करमणूक , करमणूक आणि करमणूक ... हेच होतंय गेल्या काही वर्षांमध्ये.
शाब्दिक फटकेबाजी आणि घोषणा यातच आपण इतके रमतोय कि प्रत्यक्ष विकास का काय वगैरे म्हणतात (मला तरी अजून दिसला नाही) त्याकडे आपला लक्षच नाहीये.
नेतेमंडळी एकामागोमाग एक काहीतरी नवीन मुद्दा उचलतात आणि मग त्याच एका गोष्टीभोवती मिडिया फिरत राहते .

जरी राष्ट्रपतीपद हे सर्वोच्च असलं तरी त्याकरता एवढा गोंगाट करायची मुळीच जरुरी नाही . वास्तविक पाहता त्या पदाला मान सोडला तर बाकी काहीच नाहीये! आणि थोडाफार काही अधिकार आहेत ते एखादा अपवाद वगळता कोणी वापरले नाहीत.
सध्याच्या राष्ट्रपती तर दयावान आहेत .. ३-४ लोकांचे फाशीची शिक्षा कमी करून त्यांनी फार पुण्य मिळवलाय.. असो.

माझा मुद्दा हा आहे कि या सगळ्या राजकीय धुळवडीत जे असंख्य घोटाळे आहेत ते मुद्दाम नजरेआड केले जातात ..

तो कृपाशंकर कुठे आहे  ? अटक कधी ?
कर्नाटकात येद्दीच्या मालमत्तेवर CBI  ने छापा घातला .. पुढे काय ?
९ महिने तुरुंगात राहून कलमाडीचा राजकीय पुनर्जन्म झाला?
अफझल गुरु , कसाब  यांच्याबद्दल न बोललेलं बरं.
खाणसम्राट रेड्डी बंधू आणि कैक अनेक white coller माफिया आज राजरोस उथळ माथ्याने वावरत आहेत.
त्याचं काय ?

आज मिडीयानेदेखील मागे वळून पहायची गरज आहे .. धूर दिसतोय ... !! वेळीच उपाय बघायला हवा.
नाहीतर ...
अडाणी जनता , भूषणा भारता हेच पुन:श्च सिद्ध होईल !



0 comments:

Post a Comment